Pregnant Goat Care गाभण शेळ्यांना कसा आहार द्यावा?

Pregnant Goat Care शेळी पालनामध्ये यश कळपामध्ये जन्माला येणाऱ्या करडावर अवलंबून असते त्यासाठी शेळी गाभण असणे आवश्यक आहे.दोन वर्षाला तीन वेळेस शेळी गाभण पाहिजे.शेळीपालन व्यवसायामध्ये संगोपणाला जितके महत्त्व तितकच महत्त्व गाभण शेळीचे आरोग्य व व्यवस्थापनाला सुद्धा आहे.पावसाळ्यात गाभण शेल्याची विशेष काळजी घ्यावी लागते.गाभण शाळांच्या व्यवस्थापनात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो याविषयीची माहिती खालील प्रमाणे.चांगल्या वजनाची सशक्त करड जन्माला येण्यासाठी गाभण शेळ्यांना वाळलेला व ओला चारा खुराक आणि nखनिज मिश्रण यांचा पुरवठा योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे.

शेळीं गाभण काळातील व्यवस्थापन

गाभण काळातील शेवटचा किमान एक महिना समतोल आहाराचा पुरवठा करावा. शाळांना गोठ्यातच फिरण्याची सोय करावी गाभण काळात शेवटच्या तीन ते चार आठवड्यामध्ये गर्भाशयातील पिल्लांच्या उत्तम वाढीसाठी उत्तम प्रतीच्या चाऱ्या बरोबरच दररोज बरोबरच दररोज 250 ते 350 ग्राम खुराक द्यावा. शेळ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्यावे, थंड पाणी किंवा पावसाचे पाणी अजिबात देऊ नये. त्यामुळे शेळीला सर्दी यासारखे आजार होऊ शकतात. शक्यतो पावसाळ्यात गाभण शाळांना सुखाचारा द्यावा.जसे की भरडलेला मका, गहू, सोयाबीन, यांचे मिश्रण करून द्यावे.

गभान शेळ्यांन ओलसरपणा राहून शेळ्यांच्या खुरामध्ये जखमा होतात. पावसाळ्यात हिरवा ओला चारा जास्त प्रमाणात उपलब्ध असतो त्यामुळे गाभण शेळ्यांमध्ये अंग बाहेर येणे हजार मोठ्या प्रमाणात आढळून येतो. असे असल्यास पशुवैद्यकांकडून योग्य उपचार करून घ्यावेत. अशा प्रकारे शेळ्यांची काळजी घेतल्यास पावसाळ्यातील शेळ्यांचे आरोग्य उत्तम राहील.

Leave a comment