Bhavantar yojana 2024 राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 मधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5 हजार रुपये अनुदानाची घोषणा केली आहे. 29 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देऊन 4194.68 कोटी रुपयांच्या रकमेला देखील मंजुरी देण्यात आली आहे. या अनुषंगाने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे माहिती गोळा करण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे.
Bhavantar yojana 2024
योजनेच्या अंतर्गत 20 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट 1000 रुपयाचे अनुदान तर 20 गुंठे पेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर जास्तीत जास्त 2 हेक्टर च्या मर्यादेमध्ये अनुदान दिले जाणार आहे.
4194.68 कोटी रुपये मंजुर
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानासाठी 2646.34 कोटी रुपये तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1548.34 कोटी रुपये असे एकूण 4194.68 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
ही रक्कम पात्र होणाऱ्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे वितरित केली जाणार आहे.
एक महतत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून राज्य शासनाच्या माध्यमातून बचत खाते उघडण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. Bhavantar yojana 2024
एकूण 4194.68 कोटी रुपयांचे रक्कम ही या बचत खात्यामध्ये क्रेडिट केले जाईल आणि या खात्याच्या माध्यमातून पात्र होणारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे या अनुदानाचा वितरण केले जाणार आहे.
DBT द्वारे मिळेल अनुदान
खरीप हंगाम 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण अर्थात डीबीटीच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्याकरता नवीन बचत खाते स्टेट बँक ऑफ इंडिया उघडण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. Bhavantar yojana 2024
ज्यामध्ये आयुक्तालयातील संचालक विस्तार व प्रशिक्षक हे मेकर तर कृषी युक्त हे चेकर म्हणून काम करणार आहे.
अशाप्रकारे या खात्यामध्ये हे रक्कम वितरित करून बचत खात्यामध्ये टाकून या खात्यामधून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे.
अतिशय महत्त्वाचा सहाय्यक टप्पा पार पडलेला आहे आणि या खात्यामध्ये रक्कम क्रेडिट करून लाभार्थी पात्र झाल्याबरोबर वितरणासाठी मंजुरी मिळता डायरेक्टली डीबीटीच्या द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम वितरित केली जाणार आहे.