PM pik vima yojana कृषी विभागाच्या माध्यमातून खरीप पिक विमा 2024 रब्बी व पिक विमा 2024 साठीचा क्रॉप कॅलेंडर अर्थात पीक पेरणी पीक कापणीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. या संदर्भातील महत्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
PM pik vima yojana
राज्यांमध्ये एक रुपयांमध्ये पिक विमा योजना राबवली जात आहे PMFBY च्या नवीन मार्गदर्शक सूचनानुसार राज्यांमध्ये ही पिक विमा योजना 2024-25 ते 2025-26 पर्यंत राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. खरीप हंगामामध्ये 14 पिकांसाठी तर रब्बीत हंगामामध्ये 6 पिकांसाठी ही योजना राबवली जात आहे. ही योजना राबवली जात असताना प्रत्येक पिकाचा पेरणीचा कालावधी आणि कापण्याचा कालावधी हा निश्चित करणे गरजेचे असते.
क्रॉप कॅलेंडर
शेतकऱ्यांच्या माध्यमातून केले जाणारे वैयक्तिक नुकसानीचे दावे असतील, जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या अधिसूचना असतील किंवा मध्यवर्ती येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्ती असतील अश्या सर्वांच्या नुकसान भरपाईचा आकलन करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक मानला जातो तो म्हणजे क्रॉप कॅलेंडर यासाठी जिल्हा कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी विद्यापीठाचे संशोधक वैज्ञानिक यांच्या मदतीने प्रत्येक जिल्हास्तरावर / प्रत्येक तालुकास्तरावर त्या त्या पिकाच्या लागवडीची तारीख आणि त्या त्या पिकाच्या लागवडीच्या कापणीची तारीख ही निश्चित केले जाते.
अशा प्रकारचे क्रॉप कॅलेंडर बनवला जाते आणि अधिसूचित पिकांचा वेळापत्रक म्हणून कृषी आयुक्तालयाला सादर केले जाते. PM pik vima yojana
नेमकी काय असते क्रॉप कॅलेंडर
कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून याचा आकलन करून याला मंजुरी दिली जाते.
मंजुरी देऊन पुन्हा एकदा हे क्रॉप कॅलेंडर जिल्हा कृषी विभागाला याचबरोबर सर्व पिक विमा कंपन्याला दिले जाते.
या पीक पेरणी आणि कापण्याच्या कालावधीच्या वेळापत्रकानुसार पुढे पिक विमा योजनेच्या अंतर्गत जी नुकसान भरपाई असेल दाव्याची मंजुरी असेल हे सर्व प्रक्रिया पार पाडली जाते.
एकंदरीत पिक विमा योजनेची अंमलबजावणीची प्रक्रिया या क्रॉप कॅलेंडर नुसार पार पाडले जाते.
अतिशय महत्त्वाचा असणारे क्रॉप केलेला 9 ऑगस्ट 2024 रोजी खरीप हंगाम 2024 आणि रवी हंगाम 2024 साठी प्रकाशित करण्यात आले आहे.
असे पाहा क्रॉप कॅलेंडर
PM pik vima yojana हे पाण्यासाठी कृषी विभागाच्या वेबसाईट वर या.
कृषी महाराष्ट्राच्या वेबसाईटची डायरेक्टली लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करा.
साईट वर आल्यानंतर सांख्यिकी प्रधानमंत्री पिक विमा योजना याच्यावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर 2024 ची खरीप हंगामाने रवी हंगाम साठीचे कॅलेंडरच्या PDF वर क्लिक करा.
ज्यामध्ये या संदर्भातील प्रस्तावना, पिक विमा कंपन्यांची नावे, आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली प्रस्तावना पाहू शकता.
ह्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये अधिसूचित पिकाची धान किंवा काही जिल्ह्यांमध्ये कापूस, सोयाबीन असे प्रत्येक जिल्हास्तराच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा कृषी अधीक्षकांच्या माध्यमातून देण्यात आलेले क्रॉप कॅलेंडर पाहू शकता.
यामध्ये प्रत्येक पिकाच्या पेरणीच्या कालावधी तालुकास्तरावर वेगवेगळ्या कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
PM pik vima yojana हे वेळापत्रक मंजूर करून 9 ऑगस्ट 2024 रोजी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आले आहे.
आपण देखील हे वेळापत्रक आपल्याकडे ठेवू शकता कारण नुकसानीचे दावे करत असताना हे अतिशय उपयोगी पडणार आहे.