Table of Contents
Namo Shetkari Yojana संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या शेतकरी गेल्या पाच महिन्यापासून ज्या योजनेच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत अशा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे.
Namo Shetkari Yojana
परळी येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चौथ्या हाप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. ज्यामध्ये राज्यातील पात्र झालेल्या 90 लाख 88 हजार 556 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयाचे हाप्त्याचे वितरण करण्यात आले आहे.
गेल्या पाच महिन्यापासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती हफ्ता येणार की नाही योजना सुरू आहे की बंद आहे अशा प्रकारच्या बऱ्याच साऱ्या अफवा देखील या संबंधात उडवण्यात आल्या होत्या आणि अगदी दोन दिवसांपूर्वी निधी वितरित करून या योजनेच्या या चौथ्या हाप्त्याचे वितरण करण्यात आले आहे.
Namo Shetkari Yojana शासनाला जर मदत करायची असेल तर तात्काळ सुद्धा करता येते याचे उत्तम उदाहरण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे.
ज्यामुळे राज्यातील 90 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांचा अनुदानाचा वितरण करण्यात आले आहे.
याच कार्यक्रमाच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापूस अनुदानाच्या वाटपाचे देखील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या संदर्भातील जे जे अपडेट येतील ते अपडेट देखील नक्कीच जाणून घेऊयात.