mahanagar palika job सरकारी नोकरीची नवीन जाहिरात आली आहे 14 ऑगस्ट 2024 रोजी नोकरीच्या जागा बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये गट क अंतर्गत १८४६ जागांवर भरती होणार आहे. पदाचे नाव कार्यकारी सहाय्यक आहे ज्याचे पूर्वीचे नाव लिपिक आहे.
mahanagar palika job
जर या संधीचा सोनं करायचे असेल आणि बीएमसी मध्ये नोकरी मिळवायचे असेल तर 1845 जागांसाठी कोणाला अर्ज करता येणार, कसा करता येणार, कुठे करता येणार, कागदपत्र काय असतील, वयोमर्यादा, पगार किती मिळणार ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत. बीएमसी मध्ये 1846 रिकाम्या जागा भरण्यासाठी 14 ऑगस्टला जाहिरात आली जाहिरात वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. जाहिरातीची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून संपुर्ण जाहिरात वाचा.
पदाचा तपशील
mahanagar palika job एकूण जागा 1846 पैकी कार्यकारी सहाय्यकसाठी 506 जागा खुला वर्ग म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी आहे.
1340 जागा या वेगवेगळ्या आरक्षणांमध्ये वाटण्यात आलेल्या आहेत.
कोणत्या आरक्षणासाठी किती जागा आहेत ते पाहण्यासाठी जाहिरात नक्कीच पाहा.
पात्रता
अर्ज करायचा असेल तर उमेदवार पहिल्याच वेळेस दहावी पास तसेच पहिल्याच वेळेस कमीत कमी 45% मार्क्स सोबत आर्ट सायन्स किंवा कॉमर्सचा ग्रॅज्युएट असला पाहिजे.
टेक्निकल मध्ये उमेदवार थर्टी डब्ल्यू पी एम म्हणजे 30 शब्द पर मिनिट टायपिंगची परीक्षा पास असणे गरजेचे आहे.
MS-CIT चा किंवा 8 जानेवारी 2018 च्या या जीआर मध्ये दिलेल्या माहितीनुसार कम्प्युटर किंवा आयटीची परीक्षा पास असणे गरजेचे आहे.
कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टम, वर्ड, एक्सेल, पावर पॉइंट, डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल, इंटरनेट याचे नॉलेज असणे गरजेचे आहे.
वय मर्यादा
mahanagar palika job ओपन कॅटेगरी म्हणजेच खुल्या वर्गातून अर्ज करणार असतील त्यांचे कमीत कमी वय हे 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय हे 38 वर्ष असायला पाहिजे.
आरक्षणामध्ये म्हणजेच मागास वर्गातील उमेदवार असतील तर कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त वय हे 43 वर्ष असले पाहिजे.
वय मर्यादा मध्ये दिल्या जाणाऱ्या इतर आरक्षना संदर्भातली माहिती म्हणजे माझी सैनिक, खेळाडू, अनाथ, स्वातंत्र्यसैनिक इत्यादी सर्व माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहेत ती नक्की वाचा सोबत आरक्षणा नुसार वयोमर्यादा किती असली पाहिजे ती देखील माहिती मिळेल.
निवड पद्धत
mahanagar palika job अर्ज केल्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल जी ऑप्शनल म्हणजे चार ऑप्शन सोबत त्यात किती मार्क मिळाले यानुसार एक लिस्ट लावली जाईल म्हणजेच मेरिट लिस्ट आणि आरक्षणा नुसार भरती करण्यात येईल.
परीक्षा 100 मिनिटांची असेल त्यात मराठी आणि इंग्रजी भाषा व व्याकरण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे विषय असतील प्रत्येक विषयाला 50 मार्क्स असा 200 मार्कांचा ऑनलाईन पेपर द्यावा लागणार आहे.
ज्यामध्ये पास होण्यासाठी कमीत कमी 45% मार्क म्हणजेच 200 पैकी कमीत कमी 90 मार्क मिळाले पाहिजे.
परीक्षेसंदर्भातील इतर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहेत.
अर्ज पद्धत
mahanagar palika job अर्ज ऑनलाईन करावा लागणार आहे.
त्यासाठी Https://portal.mcgm.gov.in/for__prospect/carees-all/recruitment/chief_personal_officer या दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करता येणार आहेत.
अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असतील किंवा तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर 9513253233 या कॉल सेंटर नंबर वर सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कॉन्टॅक्ट करता येणार आहे.
अर्ज जमा झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या आणि ती सांभाळून ठेवा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
अर्ज भरायला 20 ऑगस्ट 2024 पासून सुरुवात झाली आहे.
अर्ज भरायची आणि त्यासाठीची फी भरायची शेवटची तारीख ही 9 सप्टेंबर 2024 रात्री 11:59 मिनिटांपर्यंत असेल.
अर्ज शुल्क
जर ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरणार असाल तर 1 हजार रुपये फी भरावी लागेल.
मागासवर्ग म्हणजे आरक्षणातून फॉर्म भरणार असाल तर 900 रुपये फी असेल.
ही फी ऑनलाईनच भरायचे आहे आणि फी भरल्यानंतर जी पावती मिळेल त्याची देखील प्रिंट काढून ती सांभाळून ठेवायची आहे. mahanagar palika job
जी फी भराल ती कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही हे लक्षात असू द्या.
आवश्यक कागदपत्रे
परीक्षेच्या वेळी, हॉल तिकीट हे बीएमसीच्या वेबसाईटवरच मिळेल ते त्यासोबत
ओरिजनल फोटो
ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा इत्यादी जे ओळखपत्र असेल त्याची एक झेरॉक्स
ऑनलाईन फी भरली त्याची पावती
ही कागदपत्रे सोबत न्यायच्या आहेत.
mahanagar palika job परीक्षा केंद्रावरची नियमावली व्यक्तींसाठीच्या सूचना तसेच परीक्षेचे स्वरूप काय असेल ही सर्व माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचा आणि पात्र असाल तर लगेच अर्ज करा.