pik pahani राज्यातील लाखो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे. राज्यात भावांतर योजनेअंतर्गत सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला राज्य शासनाच्या माध्यमातून प्रति हेक्टरी 5 हजार रुपये, जास्तीत जास्त प्रति शेतकरी दोन हेक्टर च्या मर्यादेपर्यंत 10 हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.
pik pahani
या अनुदानाच्या वितरण प्रक्रियेसाठी 21 ऑगस्ट 2024 रोजी पोर्टल तयार करण्यात आले आहे आणि ही सर्व प्रक्रिया पार पाडले जात असताना राज्यामध्ये लाखो शेतकरी अनुदानापासून वंचित राहतील की काय अशा प्रकारचे शक्यता देखील निर्माण झाली होती. कारण या योजनेच्या अनुदानाचा वितरणाचा शासन निर्णय निर्गमित करत असताना यामध्ये जे शेतकरी ई पीक पाहणी केलेले आहेत असे ई पीक पाहनी झालेले शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाईल अशा प्रकारची अट घालण्यात आलेली होती.
बरेचशे शेतकरी ठरताय अपात्र
pik pahani मात्र बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केल्यानंतर त्यांचा ई पीक पाहणीचा डाटा उपलब्ध झालेला नाही, बऱ्याच शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झालेली आहे आणि त्यांच्या सातबाऱ्याला ई पीक पाहणी नोंदी देखील लागलेली आहे परंतु ई पीक पाहणीच्या यादीमध्ये अशा शेतकऱ्यांचे नाव उपलब्ध नाहीत त्यामुळे जवळजवळ 20 ते 25 टक्के शेतकऱ्यांचे नाव या नव्याने देण्यात आलेल्या यादीमध्ये आलेली नव्हते आणि या पार्श्वभूमी वर राज्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोश निर्माण झाले होता लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वेळोवेळी याच्यासाठी कृषीमंत्र्यांकडे मागणी केली जाती आणि कृषिमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे याच्या संदर्भातील पाठपुरावा करण्यात आला होता.
कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान मोठी घोषणा
21 ऑगस्ट 2024 रोजी परळी येथे झालेल्या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या अनुदानाचा वितरण करत असताना राज्यातील लाखो शेतकरी यापासून अपात्र राहू नयेत म्हणून ई पीक पाहणीची अट शिथिल करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. pik pahani
ज्या शेतकऱ्यांच्या सातबाराला कापूस आणि सोयाबीन पिकाच्या खरीप हंगाम 2023 च्या नोंदी लागलेल्या आहेत अशा सातबाऱ्या वरील नोंदणी नुसार सरसकट सोयाबीन आणि कापूस पिकाचा अनुदान देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
अर्थात ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झालेली आहे अशा शेतकऱ्यांचा डाटा ऑलरेडी उपलब्ध आहे.
याचबरोबर ई पीक पाहणी करून यादीमध्ये नाव नाहीत परंतु त्यांच्या सातबाऱ्याला कापूस आणि सोयाबीन पिकाच्या नोंदी लागलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना देखील या अनुदान प्रक्रियेमध्ये आता समाविष्ट केले जाणार असल्याचे घोषणा केली आहे.
आता सर्वच शेतकरी होणार पात्र
pik pahani नवीन मार्गदर्शक सूचना याची कार्यपद्धती अनुदानित कार्यपद्धती आहे ती नव्याने निर्गमित केली जाईल त्याच्या संदर्भातील सूचना कृषी आणि महसूल विभागाला दिल्या जातील महसूल विभागाच्या माध्यमातून सातबाऱ्याला कापूस आणि सोयाबीन पिकाच्या नोंदी असलेला डाटा आता कृषी विभागाला उपलब्ध करून दिला जाईल आणि हा डाटा उपलब्ध झाल्यानंतर जे शेतकरी यादीमध्ये नाव नाहीत जे शेतकरी अनुदानापासून वंचित राहतील अशा प्रकारचे परिस्थिती निर्माण झाली होती ते शेतकरी देखील आता अनुदानासाठी पात्र केले जातील.
अनुदानासाठी होऊ शकतो विलंब
यासाठीची जी संयुक्तपणे पद्धती असेल ती प्रक्रिया पार पाडले जाईल आणि लवकरच नव्याने याद्या प्रकाशित करून जे शेतकरी यामध्ये नव्याने पात्र होतील त्यांच्या अनुदानाची प्रक्रिया पुढे राबवली जाणार आहे.
यामुळे आता थोडासा विलंब होऊ शकतो मात्र वंचित राहणारे शेतकरी आता यामध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
pik pahani या संदर्भातील नवीन काही मार्गदर्शक सूचना, नवीन परिपत्रक आदेश उपलब्ध होतील ते देखील आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.