kapus soybean anudan 2024 सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट, पहा ऑनलाईन अनुदान स्टेटस

kapus soybean anudan राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या हेक्टरी पाच हजार रुपये अनुदानाच्या वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

यासाठी परळी जिल्हा बीड येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवाच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अनुदान वितरणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी एक पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून आता कृषी विभागाला शेतकऱ्यांची माहिती अपडेट करणे असेल, याचबरोबर शेतकऱ्याला अनुदानाची स्थिती पाहणे असेल हे दोन्ही काम सहज शक्य होणार आहेत.

अशी पाहा अनुदानाची स्थिती

यासाठी scagridbt.mahait.org हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. ज्याची लिंक खाली देण्यात आली आहे.
संकेतस्थळावर आल्यानंतर दोन ऑप्शन दाखवल्या जातील ज्यात एक म्हणजे लॉगिन.
कृषी विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना यामध्ये लॉगिन युजर आयडी पासवर्ड दिलेला आहेत त्यांनी लॉगिन आयडी पासवर्ड टाकून शेतकऱ्याची माहिती अपडेट करता येणार आहे.
दुसरे ऑप्शन m डीसबर्समेंट स्टेटस अर्थात वितरणाची सध्याची स्थिती पाहण्यासाठीचे ज्यामध्ये शेतकऱ्यांना स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकून अनुदानाच्या वितरणाची स्थिती पाहता येणार आहे.

kapus soybean anudan यासाठी आधार कार्ड नंबर टाका यानंतर कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहून एंटर करा आणि गेट आधार ओटीपी वर क्लिक करा.
जर डाटाबेस आणि आधार नंबर अपडेट असेल तर रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल.
ओटीपी एंटर करून गेट डाटावर क्लिक करा.
गेट डाटावर क्लिक केल्यानंतर यामध्ये डाटा अपडेट होत आहे.

लवकरच अपडेट होईल डाटा

पोर्टल वर नवीन विकसित आलेला डाटा अपडेट करण्यात आलेले नाही.
त्यामुळे सध्या तरी एरर देत आहे.
परंतु ज्या वेळेस यामध्ये शेतकऱ्याची माहिती अपडेट व्हायला सुरू होईल तेव्हा अनुदानाचे वितरण सुरू होईल.

kapus soybean anudan अशा प्रकारे पोर्टल विकसित करण्यात आले आहे ज्या माध्यमातून शेतकरी आणि कृषी विभाग या दोन्हींना ही माहिती अपडेट करून लवकरात लवकर या अनुदानाच्या वितरणाची प्रक्रिया पार पाडता येणार आहे.

Leave a Comment