crop insurance online 2024 पीकविमा मिळाला नाही, मग करा ही तक्रार

crop insurance online खरीप हंगाम 2023 मध्ये पिक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता विविध जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये येल्लो मोजक, काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा सामना तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या खंडामुळे शेती पिकांचा नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या माध्यमातून लाखो दावे दाखल करण्यात आले होते काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या या दाव्याचे पंचनामे देखील करण्यात आले आहे. काही ठिकाणी सर्वे सर्वे न करता सरसकट दावे नामंजूर करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात या संबंधात शेतकऱ्यांच्या तक्रारी येत होत्या बुलढाणा, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये याचे प्रमाण सर्वाधिक होते.

पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या लाखोमध्ये

crop insurance online खरीप हंगाम 2023 च्या पिक विमाचे वाटप होत असताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना 25% पीक विमाचे वितरण करण्यात आले आहे.
काही महसूल मंडळ सरसकट पिक विमा साठी पात्र होतील तर त्यांना पिक विमा वितरण करता येईल.
परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी ज्यांनी क्लेम केले होते अशा शेतकऱ्यांचे क्लेम अद्याप कॅल्क्युलेशन झाले नाही किंवा कॅल्क्युलेशन झालेले असतील तर ते झिरो दाखवत आहेत आणि अशा शेतकऱ्यांना अद्याप देखील पिक विमा मिळालेला नाही.
राज्यामध्ये अशा शेतकऱ्यांची संख्या लाखो आहेत.

नांदेड जिल्ह्याचा पीक विमा क्लेम करण्याचे आव्हान

नांदेड जिल्ह्यामध्ये देखील क्लेम केलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांना पिकविण्याचा वितरण करण्यात आले नाही.
आता कृषी विभागाच्या माध्यमातून अखेर पावले उचलण्यात आलेली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहे, ज्या शेतकऱ्यानी पूर्व सूचना दिलेली आहे परंतु त्या शेतकऱ्यांना अद्याप जर पिक विमा मिळालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करावी अशा प्रकारचा आव्हान कृषी विभागाच्या माध्यमातून प्रेस नोट काढून देण्यात आलेला आहे.
3 सप्टेंबर 2024 पूर्वी तक्रार तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे दाखल करावी अशा प्रकारचा आव्हान या प्रेस नोटच्या माध्यमातून करण्यात आले आहे. crop insurance online

यासोबत एक तक्रार करण्यासाठीचा अर्ज नमुना देण्यात आलेला आहे.
त्याची लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून अर्ज नमुना पाहू शकता.
ज्यामध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक माहिती द्यावी लागेल आणि माहिती देऊन हा तक्रार अर्ज तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे सादर करायचा आहे.
कृषी सेवकांच्या माध्यमातून प्रस्ताविकाच्या माध्यमातून देखील हा अर्ज कलेक्ट करू शकता किंवा गावात एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज जमा करून तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये अर्ज सादर करू शकतात.

crop insurance online प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशीच परिस्थिती आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे क्लेम बाद करण्यात आले आहे किंवा बाद न करता देखील त्याचे वितरण करण्यात आले आहे.
अशाच प्रकारे आपल्या जिल्ह्यामध्ये जर परिस्थिती असेल तर आपली तक्रार देखील तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे दाखल करा.
आपल्याला पिक विमा मिळालेला नाही याची तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा.
जेणेकरून याच्या विरोधात काही पावलं उचलून पुढे पिक विमा मिळण्यासाठी मदत मिळू शकते.

Leave a Comment