MahaDBT lottery राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य पुरस्कृत सोयाबीन व कापूस मूल्य साखळी आणि उत्पादकता विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. 1000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह विविध पायाभूत सुविधांची निर्मिती, मूल्य साखळीचे विकास किंवा उत्पादकता वाढवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न यावर विशेष कार्यक्रम आखण्यात आलेला आहे.
MahaDBT lottery
या अंतर्गत 2024 या वर्षांमध्ये शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटर्स प्रेयर अर्थात बॅटरी ऑपरेटर फवारणी यंत्र किंवा कापूस साठवणी बॅग या बरोबरच काही महत्त्वाच्या बाबींचे वाटप करण्याचे शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केला गेला आणि या अंतर्गत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज देखील मागवण्यात आले होते.
अर्ज करण्यासाठी तब्बल महिना भर देण्यात आली मुदत वाढ
MahaDBT lottery साधारणपणे पावणे दोन लाखापर्यंत पंप शेतकऱ्यांना वितरण करण्याचे उद्दिष्ट योजनेच्या अंतर्गत घेऊन शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
सुरुवातीला शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज केल्यानंतर प्रत्येक शेतकरी या अंतर्गत पात्र होईल अशा प्रकारचे अपेक्षा होती.
100% अनुदानावर अर्थात शेतकऱ्यांना मोफत फवारणी यंत्राचे वाटप केले जाणार होते.
परंतु सुरुवातीला एक टप्प्यामध्ये अर्ज करण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली.
लॉटरी व्दारे होणार निवड
लाखो शेतकऱ्यांच्या माध्यमातून 100% अनुदानावर बॅटरी ऑपरेटर फवारणी यंत्र करता अर्ज करण्यात आले आहे.
शेवटी अशी परिस्थिती झाली की देण्यात येणाऱ्या पंपाचे उद्दिष्ट यापेक्षा कित्येक पटीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून बॅटरी ऑपरेटर फवारणी यंत्रासाठी मागणी करण्यात आलेली आहे.
या पार्श्वभूमी वर सर्वांना पंप मिळेल अशा प्रकारची जी शक्यता होती ती कुठेतरी मावळली आणि यामधून आता शेतकऱ्यांची लॉटरी द्वारे निवड केली जाईल आणि लॉटरी द्वारे निवड करून पात्र झालेल्या शेतकऱ्यांना 100% अनुदानावर अर्थात मोफत बॅटरी ऑपरेटर फवारणी यंत्राचे वितरण राज्य शासनाच्या माध्यमातून केला जाणार आहे.
या दिवशी लागणार लॉटरी
MahaDBT lottery साधारणपणे जुलै किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये या पंपाचे वितरण होणे अपेक्षित होते कारण शेतकऱ्यांना त्यावेळेस पंपाची गरज होते.
परंतु सरकारी योजना ज्या पद्धतीने राबवली गेली पाहिजे त्याच पद्धतीने अगदी योजनेची देखील अंमलबजावणी करण्यात आली आहे.
ज्यावेळेस शेतकऱ्याला याचे गरज नसेल अशावेळी त्या शेतकऱ्यांना वितरण करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केला जाणार आहे.
साधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये बॅटरी ऑपरेटर फवारणी यंत्रासह महाडीबीटीवर राबवल्या जाणाऱ्या इतर योजनांचे लॉटरी लागू शकते आणि या लॉटरीच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना पंपाचे वितरण केले जाणार आहे.