Ladki Bahin Yojana 2024 लाडकी बहीण योजनेबाबत नवा शासन निर्णय

Ladki Bahin Yojana राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत, परीतात्यात, विधवा, निराधार अशा विविध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

योजना राबवली जात असताना या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली होती ज्यामध्ये मुदतवाढ देऊन 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज भरण्याचे लाभार्थ्यांना मुभा देण्यात आली होती.

शासन निर्णय

Ladki Bahin Yojana या संदर्भातील शासन निर्णय 2 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करून योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्याची 31 ऑगस्ट 2024 ची शेवटची तारीख बदलून सप्टेंबर मध्ये देखील महिला लाभार्थ्यांना अर्ज करता येतील अशा प्रकारचे या माध्यमातून स्वतंत्र देण्यात आले आहे.
अर्थात ज्या महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज केले नाहीत परंतु त्या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत किंवा ज्यांचे अर्ज काही कागदपत्र मुले बाद झाले आहेत अशा महिला लाभार्थ्यांना पुन्हा सप्टेंबर मध्ये अर्ज करता येणार आहेत.

31 ऑगस्ट च्या नंतर केलेल्या लाभार्थ्यांना मिळणार फक्त 1500 रुपये

31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज केलेले आणि पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना 1 जुलै 2024 पासून लाभ दिला जाणार आहे.
अर्थात ज्यांचे 31 ऑगस्ट पर्यंतचे अर्ज आहेत असे अर्ज पात्र झाल्यानंतर त्यांना जुलै महिन्यापासून चा लाभ त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे.
मात्र 01 सप्टेंबर 2024 पासून ज्या महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून अर्ज केले जातील आणि त्यांचे अर्ज 1 सप्टेंबर 2024 नंतर मंजूर होतील अशा महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यापासून पंधराशे रुपये त्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहे. Ladki Bahin Yojana

अर्थात ज्या महिलांचे अर्ज ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र झाले त्यांना जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे 3000 रुपये क्रेडिट करण्यात आले परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिलांच्या अर्ज सप्टेंबर पासून पात्र होतील त्या महिलांना हा लाभ सप्टेंबर महिन्यापासूनच दिला जाणार आहे.
ज्यांचे अर्ज 31 ऑगस्ट पूर्वी पात्र होते त्यांना 4 हजार 500 रुपये खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहे.

Leave a Comment