Pocra 2 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2

Pocra 2 राज्यातील शेतकरी ज्या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत किंवा ज्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये नव संजीवनी आली आहे अशी योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणि या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भातील काही महत्त्वाच अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Pocra 2 राज्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा योजना अतिशय महत्त्वपूर्ण अश्या पद्धतीने राबवले गेलेली योजना आहे. 15 जिल्ह्यांमध्ये या योजनेचा अतिशय व्यापक पद्धतीने प्रचार प्रसार करत ही योजना राबवली आहे. मोठ्या प्रमाणात या योजनेसाठी निधी वितरित करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये या योजनेच्या माध्यमातून बदल घडवण्यात आला आणि यानंतर यामध्ये सोळावा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामधील 62 गावाचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे आणि एकंदरीत या 16 जिल्ह्यासह या योजनेचा पहिला टप्पा राज्यामध्ये राबवण्यात आलेला आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2

Pocra 2 या योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आलेली आहे.
त्यासाठी तत्वता मान्यता देण्यात आलेली होती आणि आता यानंतर या योजनेचा दुसरा टप्पा लवकरात लवकर राबवला जावा म्हणून मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती.
त्या संदर्भातील पाठपुरावा करण्यात आलेला होता.
एप्रिल 2023 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्राकडे या योजनेच्या पुढील टप्प्याच्या राबवण्यासाठीची पद्धतीसाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
केंद्र शासनाच्या माध्यमातून तो प्रस्ताव जागतिक बँकेकडे पाठवण्यात आला होता आणि साधारणपणे महत्त्वाच्या अशा प्रक्रिया पार पाडायचे असतात यामध्ये अतिशय महत्त्वाची आणि या योजनेसाठी महत्त्वपूर्ण आणि मुख्य प्रक्रिया राज्य शासनाच्या माध्यमातून पार पाडण्यात आली आहे ती म्हणजे या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी काही मुख्य नियंत्रक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

शासन निर्णय

2 सप्टेंबर 2024 रोजी या योजनेच्या शासन निर्गमित करण्यात आला आहे.
जागतिक बँक सहाय्यक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 करता विभाग प्रमुख नियंत्रक अधिकारी आणि अहरण व सवितरण अधिकारी घोषित करण्याच्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
प्रकल्प संचालक / प्रकल्प व्यवस्थापक नानाजी देशमुख संजीवनी यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. Pocra 2
योजनेसाठी वित्त विषेश्याग्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.

योजनेमध्ये नेमणूक केल्याने काय होते

Pocra 2 या योजनेची व्यवस्थितपणे योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी प्रकल्प संचालक किंवा विभाग प्रमुख अतिशय महत्त्वाचे असतात कारण योजना कशा पद्धतीने राबवले जाते, निधीचे वितरण कशाप्रकारे केले जाते, कोणत्या कोणत्या बाबींचा समावेश केला गेलेला आहे, निधी योग्य पद्धतीने वापरला जातोय का?, त्याचा पाठपुरावा करणारे सर्व प्रक्रिया या विभाग प्रमुखाच्या माध्यमातून पार पाडल्या जातात.
या सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी ही नेमणूक करण्यात आलेली आहे.

योजनेत नवीन 5 जिल्ह्याचा समावेश

नेमणूक करण्यात आली असल्यामुळे आणि एकंदरीत जागतिक बँकेची मंजुरी अध्यक्ष टप्प्यामध्ये असल्यामुळे कधीही योजना सुरू केली जाऊ शकते.
यामध्ये 16 जिल्हे जुने आहेत आणि आता नवीन 5 जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.
पूर्वीची एकंदरीत 5242 गाव आणि आता नवीन 5 जिल्ह्यांमधील ज्यात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर आणि चंद्रपूर या 5 जिल्ह्यांमध्ये साधारणपणे 800 पेक्षा जास्त गाव अशी मिळून 6000 गावांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे.

Pocra 2 लवकरच आणखीन एक शासन निर्णय निर्गमित केला जाईल ज्या माध्यमातून याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली 5960 गावांची यादी किंवा त्या गावांना दिलेली मंजुरीचा शासन निर्णय निर्मित केला जाईल.
योजना राज्यांमध्ये राबवण्यासाठीचे मंजुरीचा शासन निर्णय देखील राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित केला जाईल.

Leave a Comment