majhi ladki bahin yojana 2024 मोठा बदल, आता फक्त हेच अर्ज पात्र

majhi ladki bahin yojana राज्यातील 21 ते 65 वयोगटातील निराधार, विधवा, घटस्फोटीत, परीतक्त्यात, विवाहित, अविवाहित अशा विविध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजने अंतर्गत महिला लाभार्थ्यांना 1500 रुपये दरमहा मानधन दिले जात आहे.

योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहे. 2 सप्टेंबर 2024 च्या शासन निर्णयानुसार महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये देखील अर्ज करण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे. मात्र हे अर्ज भरले जात असताना या योजनेमध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 6 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

योजनेत मोठा बदल

या योजनेची अंमलबजावणी केली जात असताना 12 जुलै 2024 आणि 15 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण आणि नागरी भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समोसंघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविकास, सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र अशा विविध अकरा माध्यमातून अर्ज स्वीकारले जात होते परंतु आता या अकरा ही माध्यमातून स्वीकारले जाणारे अर्ज हे आता स्वीकारले जाणार नाहीत.
शासन निर्णयाच्या माध्यमातून यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे.

येथे अर्ज केला तरच होणार पात्र

majhi ladki bahin yojana सप्टेंबर महिन्यामध्ये स्वीकारले जाणारे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून स्वीकारले जाणार आहे.
या शासन निर्णयाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज शिवकृतीच्या देण्यात आले अधिकार रद्द करण्यात आले असून आता फक्त या निर्णयाच्या दिनांक पासून अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविका मार्फत अर्ज स्वीकारले जाणार आहे आणि तेच अर्ज पुढे पात्र केले जाणार आहे.

सप्टेंबर महिन्यामध्ये केलेले अर्ज हे सप्टेंबर महिन्याच्या 1 तारखेपासून लाभासाठी पात्र करण्यात येणार आहे.
अशा प्रकारे आता नवीन अर्ज स्विकरण्यामध्ये हा एक मोठा बदल करण्यात आला आहे.

Leave a Comment