Yojanadoot application 2024 शासनाच्या सर्व योजनांची माहिती तळागाळातील सर्व सामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून योजना दुत कार्यक्रम आखण्यात आलेला आहे ज्या अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एका योजना दुताची नेमणूक केली जाणार आहे. 3000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला 2 योजना दुत मिळणार आहेत आणि अशा प्रकारे राज्यांमध्ये 50 हजार योजना दूताची नेमणूक करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करून योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
Yojanadoot application 2024
या अंतर्गत 21 ते 35 वयोगटातील जे सुशिक्षित बेरोजगार असतील अशा युवकांना या अंतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. शासनाच्या योजना तळागाळातील सर्व सामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी त्यां माध्यमातून काम केले जाणार आहे. अश्या युवकांना प्रतीमहा 10 हजार रुपयांचे मानधन देखील दिले जाणार आहे. सहा महिन्यासाठी त्यांचे नेमणूक केली जाणार आहे.
ऑनलाईन अर्ज सुरू
Yojanadoot application 2024 या योजना दुताच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत युवकांची भरती करण्यासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
त्याचे ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आलेले आहे.
7 सप्टेंबर 2024 पासून 13 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
महायोजना दुत त्याची लिंक खाली देण्यात आली आहे 10/09/2024 सकाळी 10 वाजल्यापासून या योजनेचे अर्ज भरण्यासाठी सुरू झाले आहे.
ज्यामध्ये युवकांना या अंतर्गत नोंदणी करावी लागेल आणि कागदपत्रासह यां अंतर्गत नोंदणी केल्यानंतर पुढे पात्र होणाऱ्या उमेदवाराचे यामध्ये योजना दूत म्हणून नेमणूक केली जाणार आहे.
यामध्ये कुठल्याही विभागाचा पदवीधर विद्यार्थी उमेदवार असणे गरजेचे आहे.
सोबत आधार कार्ड, बँकेची डिटेल अशा प्रकारचे कागदपत्रे लागणार आहेत आणि हे सर्व कागदपत्र ऑनलाइन अर्ज सह या योजनेमध्ये लाभार्थ्यांना पात्र केले जाणार आहे.