Mahadbt biyane scheme 2024 रब्बी बियाणे अनुदान, असा करा अर्ज

Mahadbt biyane scheme रब्बी हंगाम 2024 करता अनुदानावर बियाण्याचे अर्ज सुरू झाले आहे.

यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

असा करा अर्ज

यासाठी महाडीबीटी फार्म स्कीमच्या पोर्टल वर या.
गुगलच्या माध्यमातून www.mahadbt.maharashtra.gov.in सर्च करून येऊ शकतात.
याची डायरेक्ट लिंक खाली देण्यात आली आहे त्यावर क्लिक करा.
पोर्टलवर आल्यानंतर वापर करता आयडी पासवर्ड किंवा आधार क्रमांक वर ओटीपी बायोमेट्रिकने लॉगिन करू शकतो.
लॉगिन केल्यानंतर अर्ज करा वर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर विविध बाबी दाखवल्या जातील त्यातील बियाणे औषधे खाते अनुदान अर्ज करण्यासाठी बाबी निवडा वर क्लिक करा. Mahadbt biyane scheme

क्लिक केल्यानंतर बियाणे औषधे व खते याचा अर्ज ओपन होईल त्यात तालुका, गाव, सर्वेक्षण क्रमांक, मुख्य घटक, बाब निवडा, पीक निवडा, अनुदान हवे असलेली बाब, बियाण्यांचा प्रकार, खत निवडा, वाण निवडा, वाण, एकूण क्षेत्र, क्षेत्र, अंदाजीत आवश्यक बियाणे ही माहिती अचूक भरा आणि खाली आपण अर्ज केलेले वाण उपलब्ध नसल्यास आपणास सदर पिकाचे अन्यवान उपलब्ध करून दिले जाईल यावर टिक करून जतन करा वर क्लिक करा.
जर दुसरी बाब निवडायची असेल तर एस करा जर दुसरी बाब निवडायची नसेल तर नो करा.
नो केल्याबरोबर ही बाब जतन होणार आहे.

असा अर्ज सादर करा

बाब जतन झालेली आहे परंतु अर्ज सादर झालेला नाही यासाठी पुन्हा अर्ज करावा लागणार आहे यासाठी अर्ज सादर करा वर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर पहा वर क्लिक करा.
पसंतीच्या बाबी एकत्रितपणे निवडून अर्ज सादर करा अशा प्रकारे दाखवला जाईल यावर पाहावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर ज्या बाबी निवडलेल्या त्या दाखवले जातील बियाणे औषधे व खते या बाबीला प्राधान्यक्रम द्या.
या योजनेच्या अटी शर्ती मान्यतेला टिक करा आणि अर्ज सादर करा वर क्लिक करा.

असे करा पेमेंट

Mahadbt biyane scheme जर 2024 साठी पेमेंट केले नसेल तर पेमेंट करण्यासाठी रीडायरेक्ट केले जाईल.
23 रुपये 60 पैसे पेमेंट करावे लागेल.
जर यापूर्वीच अर्ज करून पेमेंट केला असेल तर डायरेक्टली हा अर्ज सबमिट होईल.
या लॉटरी लागल्यानंतर SMS द्वारे कळवले जाईल पुढे लॉटरीमध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून टोकन दिले जाईल आणि या बियाण्याचे बॅच वितरण केले जाईल.

याबद्दलची पुढची प्रक्रियेची अपडेट असेल त्याबद्दल वेळोवेळी माहिती घेणार आहोत.

Leave a Comment