Bandhkam kamgar yojana बांधकाम कामगारांना ₹5000 दिवाळी बोनस मिळणार का?

Bandhkam kamgar yojana राज्यातील जवळजवळ 54 लाख नोंदणी करत सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस म्हणून 5 हजार रुपये मिळणार का म्हणून मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती आणि या संदर्भातील महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

3 वर्षांपूर्वी तत्कालीन बांधकाम कामगार मंत्री हसन मुश्री साहेब यांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना 5000 रुपये दिवाळी बोनस दिला जाणार असल्या बाबतची घोषणा करण्यात आली होती परंतु या बोनाची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती आणि या पार्श्वभूमी वर हा विषय न्यायालयामध्ये गेला होता न्यायालयाच्या माध्यमातून या बांधकाम कामगारांना बोनस दिला जावा अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले होते परंतु याची अंमलबजावणी झालेली नव्हती.

Bandhkam kamgar yojana 8 ऑक्टोबर 2024 रोजी आझाद मैदानावर बांधकाम कामगार संघटनाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले होते आणि या आंदोलन्त्यांना ज्यावेळेस बांधकाम कामगार मंत्री सुरेश खाडे साहेब भेटले होते त्यावेळेस देखील त्यांना निवेदन देण्यात आले होते यांची मागणी मान्य करण्यासंदर्भातील एक आश्वासन सुरेश खाडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले होते.

पैसे वाटण्यास सुरुवात

Bandhkam kamgar yojana 10 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील सक्रिय नोंदणी असलेले जे 27 लाखाच्या आसपास बांधकाम कामगार आहेत, नवीन नोंदणी केलेली पूनरनोंदणी केली त्यांनी ज्यांनी रिन्यूअल केले असे जवळजवळ 25 लाख बांधकाम कामगाराचे एकूण 54 लाख हजार बांधकाम कामगारांना राज्य शासनाच्या माध्यमातून दिवाळी बोनस म्हणून 5000 रुपये देण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती आणि यासाठी जवळजवळ 2700 कोटी रुपयांचा निधी हा बांधकाम कामगारांसाठी उपकारांमधून वापरण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती.
बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देण्यासाठी जी मंजुरी देण्यात आली आणि 14 ऑक्टोबर 2024 पासून ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी सक्रिय आहे त्या बांधकाम कामगाराच्या खात्यावर 5 हजार रुपयांचे बोनस वितरण करण्यासाठी सुरुवात देखील करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या काळात पैसे मिळतील का?

14 ऑक्टोबर पासून हे वितरण सुरू करण्यात आले आहे.
14 ऑक्टोबर रोजी काही वितरण झाले आणि 15 ऑक्टोबर 2024 रोजी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. Bandhkam kamgar yojana
या पार्श्वभूमी वर उर्वरित बांधकाम कामगारना या दिवाळी बोनस वाटप केले जाऊ शकते का हा प्रश्न निर्माण झालेला आहे.
कारण कुठल्यातरी मतदाराला एक प्रलोभन दिल्याचे यामधून सिद्ध होऊ शकतो.
विरोधी पक्षाच्या माध्यमातून याच्यावर आक्षेप घेतले जाऊ शकतात.
परंतु एकंदरीत पूर्वी घेतलेला निर्णय या वाटपाला पूर्वी दिलेली मंजुरी या पार्श्वभूमीवर विरोध करण्याचे कारण असू शकत नाही किंवा या वाटपामध्ये कुठल्या प्रकारची समस्या येण्याचे कारण असू शकत नाही.

या लाभार्थ्यांची दिवाळी होणार दुहेरी दुःखामध्ये

मात्र यावर काय निर्णय घेतला जातोय सुरू असलेले वाटप अशाच प्रकारे सुरू राहते की निवडणुकीचे आचारसंहितेच्या बंधनामुळे उर्वरित असलेल्या बांधकाम कामगाराचे वाटप कुठेतरी अटकवले जाते हा मोठा निर्माण झालेला प्रश्न आहे. आता लवकरच या संदर्भातील उकल समोर येईल आणि बांधकाम कामगारांचे सुरू असलेले वाटप सुरू होईल की ते निवडणुका झाल्यानंतर डिसेंबरमध्ये वाटप केले जाईल हे कळेल परंतु एकंदरीत शासनाच्या माध्यमातून थोडासा उशीर करण्यात आला कारण10 ऑक्टोबर 2024 च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी दिल्यानंतर जर तात्काळ हे वाटप सुरू केले गेले असते तर किमान 10 ते 20 लाख लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये बोनस वितरित करता आले असते.

Bandhkam kamgar yojana आता जेवढे बांधकाम कामगारांना वितरित करण्यात आले त्यांचे दिवाळी गोड होणार मात्र ज्या बांधकाम काम करायला मिळाले नाही त्यांना दुहेरी दुःखामध्ये आपले दिवाळी साजरी करावी लागणार आहे एकंदरीत न्यायालयाचा निकाल असल्यामुळे पूर्वीच मंत्रिमंडळाचे मंजुरी दिली असल्यामुळे या सर्व बाबी पॉझिटिव्ह असल्यामुळे या बांधकाम कामगारांच्या खात्यामध्ये हा दिवाळी बोनस येऊ शकतो आणि यावी अशी अपेक्षा आहे. या संदर्भातील जी अपडेट येतील किंवा जी माहिती पुढे उपलब्ध होईल ती माहिती वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Leave a Comment