Mahadbt Tractor Anudan​ 2024 महाडीबीटी पोर्टलवरून ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज

Mahadbt Tractor Anudan​ महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो त्यामध्ये ट्रॅक्टर, अवजारे, विहिरीसाठी अनुदान, छोटी मोठी यंत्र, शेततळे, पाईप, ठिबक, फवारणी पंप, बियाणे यासारख्या विविध घटकांसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते पण शेतकऱ्यांना अनुदानासाठी अर्ज करायचा कुठे आणि कसा याची माहिती मिळत नाही त्यामुळे शेतकरी पात्र असूनही अर्ज करत नाहीत.

तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ट्रॅक्टरसाठी महाडीबीटीवर अर्ज करता येऊ शकतो. महाडीबीटीवर ट्रॅक्टरसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

Mahadbt Tractor Anudan

अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल या

गुगल ओपन करा त्यामध्ये mahadbt farmer login असं टाईप करून सर्च करा याची डायरेक्ट लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करा.
त्यानंतर समोर एक वेबसाईट ओपन होईल त्यावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर महाडीबीटी पोर्टल ओपन होईल.
इथे अर्जदार लॉगिन करा या ऑप्शन वर क्लिक करून त्याखाली वापर करता आयडी टाकून किंवा आधार क्रमांक टाकून लॉगिन करू शकतात.
आधार क्रमांक टाकला की ओटीपी आणि बायोमेट्रिकचा पर्याय वापरून तुम्ही लॉगिन करू शकता.
खालील केपचा रिकाम्या रकान्यातच टाका आणि लॉगिन वर क्लिक करा.
प्रोफाइल पूर्ण झाले असेल तर अर्ज करा असे ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा.

ट्रॅक्टर बाबी निवडा

Mahadbt Tractor Anudan क्लिक केल्यानंतर पेज ओपन होईल त्यामध्ये कृषी यांत्रिकरण, सिंचन साधने आणि सुविधा, बियाणे औषधे खते, फल उत्पादन, सौर कुंपण अशी विविध पर्याय दिसतील.
त्यामध्ये आपल्याला ट्रॅक्टर साठी अर्ज करायचा आहे म्हणून कृषी यांत्रिकरणाच्या समोर दिसणाऱ्या बाबी निवडावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर कृषी नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये मुख्य घटक निवडा मध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खनिज साठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.
तपशिलामध्ये ट्रॅक्टर पर्याय निवडा.
व्हील ड्राईव्ह मध्ये दोन आणि चार डब्ल्यू पैकी जो ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्यानुसार ऑप्शन निवडा.
किती एचपी चा ट्रॅक्टर पाहिजे तो निवडा.

kisan tractor yojana​

मी पूर्वसंमतीने कृषी यंत्र व अवजार खरेदी करणार नाही पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे या सूचनेच्या समोरील बॉक्स वर ब्लु टिक करा.
आता बाब निवडली आहे अर्ज जतन करा यावर क्लिक करा. Mahadbt Tractor Anudan
क्लिक केल्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केलाय आपणास आणखी काही घटक निवडायचे आहेत का असा प्रश्न स्क्रीन वरती विचारला जाईल त्यावर यस केले तर अन्य बाबी तुम्ही निवडू शकता म्हणजे एकाच वेळेला ट्रॅक्टरला अर्ज केलाय तसाच पॉवर टिलरसाठी देखील अर्ज करू शकता किंवा सिंचना मधले एखाद्या बाबीसाठी देखील अर्ज करू शकता.
नो वर क्लिक केले तर मुख्य पृष्ठ वर येईल.

त्ट्रॅक्टरसाठी अर्ज करा

Mahadbt Tractor Anudan अजून अर्ज केला नाही फक्त ट्रॅक्टर ही बाब निवडलेली आहेत आता अर्ज सादर करा वर क्लिक करा.
सुरुवातीला नोटिफिकेशन येईल त्याला ओके करा आणि पुढे पहा यावर क्लिक करा.
समोर अर्ज ओपन होईल त्यामध्ये प्राधान्य क्रम निवडा म्हणजे जर एकापेक्षा अनेक बाबी या योजनेअंतर्गत निवडल्या असतील तर त्याचा प्राधान्यक्रम निवडावे लागणार आहे.
योजने अंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील यावर ब्ल्यू टिक करा आणि अर्ज सादर करा या ऑप्शन वर क्लिक करा.

kisan tractor yojana​

असे करा ऑनलाइन पेमेंट

Mahadbt Tractor Anudan​ जर पहिल्यांदाच महाडीबीटीवरून अर्ज करत असाल तर 23 रुपये 60 पैशांची फीस भरावी लागणार आहे.
ही फीस भरण्यासाठी मेक पेमेंट वर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, आणि आयएमपीएस वरून पेमेंट करू शकता.
अशी चार ऑप्शन तुमच्या समोर दिसतील.
त्यापैकी एका पद्धतीने पेमेंट करा.
हे पेमेंट महाआयटीच्या नावावर केले जाते.
पेमेंटची प्रिंट देखील काढून ठेवू शकता किंवा पीडीएफ डाउनलोड करू शकता.

अशी पाहा आपल्या अर्जाची स्थिती

पेमेंट झाले की मुखपृष्ठावर येऊन मी अर्ज केलेल्या बाबी या ऑप्शन वर क्लिक करून छाननीअंतर्गत अर्ज या राखण्यात अर्जाचे सगळे डिटेल्स पाहता येतील.
अर्ज मंजूर झाला किंवा नाकारला गेला तर त्याचे स्टेटस देखील इथे पाहू शकता.

Mahadbt Tractor Anudan​ या योजनेला पात्र झाले म्हणजे या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर मिळाला तर या वेबसाईटवरूनच कागदपत्र अपलोड करावे लागणार आहेत. त्यामुळे लॉगिन आयडी आणि पासवर्ड तेवढा लक्षात ठेवा अर्ज मंजूर झाला तर लागणारी कागदपत्राची यादी मुखपृष्ठावर जाऊन पाहू शकता तर अशाप्रकारे ट्रॅक्टरसाठी महाडिबीटीवरून अर्ज करता येतो.

Leave a Comment