Soyabean Kapus Anudan 2024 या तारखेपासून सोयाबीन कापूस अनुदान येणार खात्यात

Soyabean Kapus Anudan राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप 2023 मधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या हेक्टरी 5 हजार रुपयांच्या अनुदानाच्या वितरणाच्या तारखेच्या संदर्भातील व प्रकाशित करण्यात आलेल्या यादीमध्ये नाव नसलेले शेतकऱ्यांच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाची इपिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकटे 5 हजार रुपये तर जास्तीत जास्त 2 हेक्टर मर्यादेपर्यंत अर्थात जास्तीत जास्त 10 हजार रुपयापर्यंत अनुदान जाहीर करण्यात आले आहे. प्रति शेतकरी कमीत कमी हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना दिल जाणार आहे.

या संदर्भातील शासन निर्णय 29 जुलै 2024 रोजी निर्मित करण्यात आला आहे. ज्यामध्ये कार्यपद्धती देखील निर्गमित करण्यात आली आहे. तर शेतकऱ्यांना आधार कन्सल्ट सामूहिक क्षेत्रधारक जे शेतकरी आहेत त्यांसाठी सामूहिक क्षेत्रासाठी एका शेतकऱ्याच्या नावाची घोषणा आणि आधार कन्सेंट असेल त्याची माहिती असेल ती मागवण्यात आली आहे.

ह्या तारखेला खात्यात जमा होणार पैसे

14 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे अनुदान वितरित करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सेंट्रलाईज खाते खोलण्यात आले आहे. Soyabean Kapus Anudan
या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी पात्र होतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचा वितरण केले जाणार आहे.
ह्या अनुदानाचे वितरण 21 ऑगस्ट 2024 पासून पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केला जाणार आहे.
त्यानंतर जे शेतकरी यामध्ये पात्र होतील त्या शेतकऱ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहे.
डायरेक्टली डीबीटीच्या माध्यमातून ह्या अनुदानाचे वितरण करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अनुदानाचा वितरण केले जाणार आहे.

कृषी विभागाच्या माध्यमातून बंद आंदोलन

जी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती ती जमाबंदी आयुक्तांच्या माध्यमातून कृषी विभागाला पात्र शेतकऱ्यांच्या ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या देण्यात आल्या आहे. Soyabean Kapus Anudan
परंतु या यादीमध्ये बऱ्याच ई पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची नाव आलेली नव्हते.
ज्या शेतकऱ्यांच्या सातबाराला या सोयाबीन आणि कापूस पिकाची नोंद लागलेली आहे त्या शेतकऱ्यांचे देखील नाव या यादीमध्ये नव्हते आणि या परश्यावर मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

कृषी सहायकांना शिवीगाळ, मारहाण असे बरेच प्रकार राज्यांमध्ये घडून आले होते आणि या पार्श्वभूमी वर या योजनेचे काम बंद आंदोलन हे कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले होते.
ह्या बंद आंदोलना मुळे योजनेमध्ये दिरंगाई होण्याचे संकेत निर्माण झाले होते.
मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारन्याची प्रोसेस बंद करण्यात आली होती.
यामध्ये असलेले तांत्रिक दोष बिघाड हा जमाबंदी आयुक्तांच्या निदर्शनास आलेला आहे.

लवकरच जाहीर होणार नवीन यादी

ज्या शेतकऱ्यांच्या सातबाराची नोंद लागलेले असे खाते या यादीमधून मायनस आल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामध्ये दुरुस्त्या करून आता नवीन याद्या जमाबंदी आयुक्तांच्या माध्यमातून लवकरच दिल्या जातील जेणेकरून ज्या शेतकऱ्यांचे नाव यामध्ये ई पीक पाहणी करून सातबारा नोंदी येऊन देखील आले नव्हते अशा शेतकऱ्यांची नाव आता यामध्ये येतील आणि आल्यानंतर त्या शेतकऱ्यांना देखील आधार कॉन्सन्ट आणि ज्या शेतकऱ्यांचे सामूहिक क्षेत्र असेल अश्या सामूहिक क्षेत्रधारकांची एका व्यक्तीची माहिती देखील द्यावी लागणार आहे. Soyabean Kapus Anudan
लवकरात लवकर हा डाटा कृषी विभागाला दिला जाईल आणि जेवढ्या लवकर डाटा दिला जाईल तेवढ्या लवकर या अंतर्गत जे शेतकरी अद्याप पात्र झाले नाहीत असे शेतकरी पात्र करून त्यांच्या अनुदानाचे वितरणाची प्रक्रिया देखील सुरू केली जाणार आहे.

निधी कमी पडण्याची शक्यता

4,192 कोटी रुपयांचा निधी हा सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणासाठी मंजूर करण्यात आलेला आहे.
परंतु एकंदरीत ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या आकडेवारी, सातबाराला नोंद लागल्या शेतकऱ्यांच्या आकडेवारी ही अतिशय मोठ्या प्रमाणात असू शकते त्यामुळे हा निधी देखील शेतकऱ्यांना अनुदान वितरणासाठी कमी पडू शकतो अशी शक्यता आहे. Soyabean Kapus Anudan
या संदर्भात पुढे जे अपडेट येतील ज्यात नवीन याद्या किंवा त्या संदर्भातील आणखीन नवीन अपडेट असतील ते देखील वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Leave a Comment