aaple sarkar kendra 2024 नवीन आपले सरकार सुरू करण्याबाबत शासनाचा मोठा निर्णय

aaple sarkar kendra राज्यात नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याबाबत राज्य शासनाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आणि या बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्य शासनाच्या माध्यमातून 19 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि या अंतर्गत राज्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले सुलभत्यांने उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 31 जुलै 2024 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 15 महाविद्यालयामध्ये प्रायोगिक तत्त्वावर आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती आणि हा निर्णय घेतल्यानंतर हा निर्णय अतिशय लोकप्रिय झालेला होता. विविध जिल्ह्यामधून अशाच प्रकारे वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात यावे अशा प्रकारचे मागणी करण्यात आली होती.

शासन निर्णय

शासनाकडे मोठ्या प्रमाणात ही मागणी करण्यात आल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून आज 20 ऑगस्ट 2024 रोजी अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील सर्व महाविद्यालय मध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
राज्यातील ज्या ज्या महाविद्यालयाकडून आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याबाबतची मागणी करण्यात येईल त्या त्या महाविद्यालयांना 19 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मान्यता देण्यात येत आहे.
aaple sarkar kendra महाविद्यालयातील आपले सरकार सेवा केंद्रास मंजुरी देताना संबंधित जिल्हाधिकारी यांनी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने आवश्यक ती कारवाई करावी तसेच सदरील कारवाई करताना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित माहिती मुंबई यांच्याशी तांत्रिक सहाय्यकथा समन्वय साधावा.

ज्या जिल्ह्यामधून जे महाविद्यालय आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी मागणी करतील त्या महाविद्यालयांना 19 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करता येणार आहे.

aaple sarkar kendra अतिशय महत्त्वाचा निर्णय ज्यामुळे आता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजच्या ठिकाणीच लागणारे विविध प्रकारचे शैक्षणिक दाखले उपलब्ध करून देण्यासाठी मदत मिळणार आहे.

Leave a Comment