Free Xerox Machine राज्य शासनाच्या माध्यमातुन महिलांना मोफत झेरॉक्स मशीन मिळणार आहे यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहे, अर्ज कुठे मिळेल आणि अर्ज कसा भरावा लागेल, त्यासोबतच ही योजना कोणत्या जिल्ह्यासाठी आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
Free Xerox Machine
सदर योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नव बौद्ध घटकातील लाभार्थ्यासाठीच आहे.
ह्या जिल्ह्यात मागवण्यात आले अर्ज
Free Xerox Machine छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवण्याबाबत अर्ज मागवणे सुरू आहेत नमुना अर्जाची लिंक खाली देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून अर्जाचा नमुना पाहू शकता.
अर्ज करा भरावा
अर्जामध्ये पासपोर्ट साईज फोटो लावावा लागेल.
संपुर्ण अर्ज अचूक भरून खाली ग्रामसेवकाची सही व शिक्का
आवश्यक कागदपत्रे
जागेचा 8 अ
जातीचा दाखला
तहसीलदार उत्पन्नाचा एक लाखाच्या आतील दाखला
दारिद्र रेषेखाली असाल तर त्याचा दाखला
ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवासी दाखला
स्वघोषणापत्र
यापूर्वी कुठल्या योजनेचा लाभ घेतला नसल्याचा दाखला
कुटुंबात कोणीही शासकीय नोकरीत किंवा निमशासकीय नोकरीत कामाला नाही याबद्दल स्वघोषणापत्र किंवा दाखला
ग्रामसभेतील योजनेचा लाभ देणेबाबत घेण्यात आलेल्या ठरावाचे नक्कल प्रत
आधार कार्ड ची प्रत
राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुकची प्रत
व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्या बाबत ग्रामसेवक यांचा दाखला
लाभदार गरजू व पात्र असल्या बाबतचा ग्रामसेवकाचा दाखला
व्यवसायासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची जागा असल्याबाबतचा पुरावा म्हणून 8 अ
व्यवसायासाठी जागा भाड्याची असल्यास त्या घरमालकाचा करारनामा
या ठिकाणी करा कर्ज
Free Xerox Machine जिल्हा परिषद अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे 2024-25 या वर्षांमध्ये मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरविण्याबाबत अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज हा जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर येथे सर्व कागदपत्रासह जमा करावा.