namo shetkari 2024 मोठी खुशखबर ! नमो शेतकरी चा हप्ता या तारखेला

namo shetkari नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील अर्थात पाचव्या हफ्त्याच्या प्रत्यक्ष असलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे.

5 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील अर्थात 18वा हफ्त्याचे वितरण होणार आहे. या हप्त्याच्या सोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाईल का अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती आणि शासनाच्या माध्यमातून देखील अशाच प्रकारे हफ्त्याचे वितरण करण्याचे संदर्भातील हालचाली सुरू करण्यात आलेल्या होत्या.

या तारखेला येणार 5वा हफ्ता

namo shetkari 30 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.
ज्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता वितरित केला जाईल अशा प्रकारच्या शक्यता निर्माण झालेल्या आहेत.

2254 कोटी 96 लाख रुपयांचा निधी वितरित

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुढील हप्त्याचा अनुदानाचे वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2254 कोटी 96 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

कार्यक्रमात होऊ शकते मोदी हस्ते हप्त्याचे वितरण

एकंदरीत याचे वितरण करण्यासाठी आवश्यक आहे तो म्हणजे निधी आणि निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे कुठल्याही कार्यक्रमांमध्ये हप्त्याचे वितरण केले जाऊ शकते आणि यासाठी आता मोठा कार्यक्रम आहे तो म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याचे वितरण.
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे 5 ऑक्टोबर 2024 रोजी येणार आहेत आणि या दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १८ व्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे.
यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे देखील वितरण केले जाऊ शकते अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली आहे आणि लवकरच कृषिमंत्र्यांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून या संदर्भातील अपडेट दिला जाईल.

namo shetkari परंतु शक्यता आहे की 5 ऑक्टोबर 2024 रोजी नमो शेतकऱ्यांनी पीएम किसान या दोन्ही योजनेचे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहेत.

Leave a Comment