Aayushman Bharat Card मोफत असणारे आयुष्मान कार्ड आता घरबसल्या काही मिनिटांमध्येच डाउनलोड करता येणार आहे आणि तेही अगदी मोफत.
Aayushman Bharat Card
तर कार्ड डाउनलोड कसे करायचे त्यासाठी कोणते बेसिक गोष्टींची आवश्यकता असेल कार्ड डाउनलोड करण्यासाठी इ केवायसी असणे गरजेचे आहे जर इ केवायसी पूर्ण नसेल तर ती कशी करायची ही सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
हे असणे आवश्यक
Aayushman Bharat Card 5 लाखांचे आयुष्मान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी काही बेसिक गोष्टी आवश्यक आहेत जसे रेशन कार्ड ऍक्टिव्ह असले पाहिजे म्हणजेच सक्रिय असले पाहिजे.
रेशन कार्ड वर ज्या सर्व फॅमिली मेंबर्स चे नावे आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक असणे किंवा वेरिफाइड असणे गरजेचे आहे.
रेशन कार्ड हे ऑनलाईन उपलब्ध असणे गरजेचे आहे म्हणजेच त्याचा 12 अंकी नंबर सुद्धा जनरेट झालेला असायला पाहिजे.
प्रत्येक फॅमिली मेंबरची ई केवायसी कम्प्लीट असणे गरजेचे आहे.
या सर्व गोष्टींची पूर्तता होत असेल तर घरबसल्या फक्त काही मिनिटांमध्येच आयुष्मान कार्ड डाऊनलोड करता येईल तेही मोफत. Aayushman Bharat Card
त्यासाठी कुठल्याही कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही किंवा कुठल्याही सेंटरला विजिट करण्याची गरज नाही.
आयुष्मान कार्ड डाउनलोड करायची प्रोसेस
त्यासाठी Https://beneficiary.nha.gov.in/ या वेबसाईटवर या.
इथे बेनिफिशियरी म्हणजे लाभार्थी आणि ऑपरेटर असे दोन लॉगिन चे ऑप्शन्स दिसेल त्यापैकी बेनिफिशियरी हा ऑप्शन टिक करून त्याखाली तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि त्यापुढे वेरिफाय बटन वर क्लिक करा.
नंतर आलेला ओटीपी टाईप करून खाली दिलेल्या कॅपच्या कोड आहे तसा इथे एंटर करा आणि लॉगिन बटन क्लिक करा.
लॉगिन झाल्यानंतर स्टेट कॉलम मध्ये लिस्ट मधून सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा.
पुढच्या कॉलम मध्ये PMJAY (प्रधानमंत्री जन आरोग्य योजना) हे नाव ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल.
नंतरच्या कॉलम मध्ये जिल्हा लिस्ट मधून सिलेक्ट करा.
Aayushman Bharat Card पुढे सर्च बाय या कॉलम मध्ये तीन ऑप्शन्स मिळतील फॅमिली आयडी, आधार नंबर आणि नाव थोडक्यात तुमचे रेशन कार्ड जर ऑनलाईन उपलब्ध असेल तर ते या तीन पैकी एका ऑप्शनने शोधता येते.
फॅमिली आयडी म्हणजेच रेशन कार्डचा बारा अंकी नंबर तसेच आधार नंबर ने देखील रेशन कार्ड शोधता येते पण आधार नंबर रेशन कार्ड सोबत लिंक आणि व्हेरिफाइड असायला हवा.
समजा फॅमिली आयडी माहित नाही किंवा आधार नंबरही लिंक नाही म्हणजे फक्त नाव टाकून इथे रेशन कार्ड सर्च करता येते.
त्यामुळे इथे नेम हा ऑप्शन सिलेक्ट करा. Aayushman Bharat Card
त्याखाली आलेल्या बॉक्समध्ये संपूर्ण नाव एंटर करा व पुढे जेंडर सिलेक्ट करून सर्च बटन क्लिक करा.
रेशन कार्ड ऑनलाइन असेल तर अशा रीतीने रेशन कार्ड ची सर्व माहिती आता स्क्रीनवर डिस्प्ले होईल.
प्रत्येक नावाच्या समोर शेवटच्या ॲक्शन कॉलम मध्ये प्रत्येक मेंबर व त्याच्या आयुष्मान कार्ड ची स्थिती मिळेल ते डाऊनलोड करण्याचे ऑप्शन दिलेला आहे.
ई केवायसी कशी करायची
Aayushman Bharat Card त्यासाठी सिम्बॉल वर क्लिक करा म्हणजे एक नवीन पेज ओपन होईल.
ई केवायसी आधार ओटीपी फिंगरप्रिंट आणि IRIS म्हणजे रेटिना स्कॅनच्या द्वारे पूर्ण करता येते.
आता फिंगरप्रिंट स्कॅनर किंवा रेटिंग स्कॅनर प्रत्येकाजवळ नसते त्यासाठी सेंटरला जावे लागते अथवा एखाद्या कार्यालयामध्ये जावे लागेल म्हणून इथे सर्वात सोपा ऑप्शन आहे आधार ओटीपी त्यावर क्लिक करा.
त्यामुळे व्यक्तीच्या आधार नंबरचे शेवटचे चार डिजिट डिस्प्ले केले जातील ते बरोबर असतील तर व्हेरिफाय बटन वर क्लिक करा.
म्हणजे आधार सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल आता आधार लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाईप करा ज्यामुळे त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती स्क्रीनवर डिस्प्ले होईल.
ई केवायसी करिता इथे लाईव्ह फोटो कॅप्चर करावा लागणार आहे म्हणजे तुमचा फोटो काढावा लागणार आहे त्यासाठी कॅमेरा एक्सेस ची परमिशन विचारली जाईल ती मोबाईलवर अथवा लॅपटॉपवर तुम्ही करत असाल तर दोन्ही ठिकाणी ती अलाउ करून फोटो कॅप्चर करून घ्या. Aayushman Bharat Card
सर्वात खाली एडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये मोबाईल नंबर आहे का असा प्रश्न दिसेल असेल तर येस अथवा नो क्लिक करा असेल तर मोबाईल नंबर एंटर करावा पुन्हा व्हेरिफाय बटन क्लिक करा.
Aayushman Bharat Card त्यानंतर जन्म वर्ष एंटर करा आधारनुसार पिनकोड भरा मग खाली जिल्हा सिलेक्ट करा त्यापुढे रेशन कार्ड वरील पत्त्यानुसार अर्बन किंवा रुरल एक ऑप्शन सिलेक्ट करा नंतर सब डिस्ट्रिक्ट मध्ये तालुका सिलेक्ट करा आणि पुढे गावाचे नाव सिलेक्ट करून सबमिट बटन क्लिक करा.
अशाप्रकारे त्या फॅमिली मेंबरची केवायसी पूर्ण होईल आणि आता कार्ड डाउनलोड साठी तयार आहे असा मेसेज स्क्रीनवर दिसेल.
आयुष्मान कार्ड डाउनलोड कसे करायचे.
डाऊनलोड करण्यासाठी लिस्टमध्ये नावाच्या समोर अप्रुड असे स्टेटस दिसत असेल त्यापुढे ॲक्शन कॉलम मध्ये डाऊनलोडचा ऑप्शन दिलेला आहे त्या ऑप्शन वर क्लिक करा. Aayushman Bharat Card
तुमच्यासमोर ऑथेंटिकेट युवर सेल्फ युसिंग आधार नंबर असे विंडो ओपन होईल म्हणजे त्या व्यक्तीचा आधार नंबर दर्शविला जाईल जिथे आधार ओटीपी नुसार व्हेरिफिकेशन करून ऑथेंटीकेशन द्या त्यासाठी वेरिफाय बटन वर क्लिक करा.
नंतर तुमच्याकडून कन्सेंट मागितले जाईल म्हणजे तुमची परमिशन मागितली जाईल का तुम्हाला तुमचे आधार कार्ड व्हेरिफाय करण्यासाठी कुठलीही हरकत नाही त्यासाठी एस या ऑप्शन वर टिक करून आलो व बटन क्लिक करा.
आता आदर्श लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल तो एंटर करून ऑथेंटिकेट हे बटन क्लिक करा.